15 April, 2011

college म्हणजे

college म्हणजे जणू एक रम्य स्वर्ग ,
रिकामेच असतात तिथे सगळे वर्ग .
lectures चा नसतो कुणालाच पत्ता ,
गबजलेलाच असतो आमचा हा college कट्टा...

Hi,Hello नेच करतात सगळे जन सुरवात ,
How r u ? I m fine आपोआपच जोडतात.
मग नव, आडनाव आणि विचारतात पत्ता ,
गबजलेलाच असतो आमचा हा college कट्टा...

गप्पांसाठी इथे कधी विषय कमी नसतात ,
कुठलातरी-कसलातरी topic घेउन बसतात .
बाजूला नुसता पडून असतो notes चा गठ्ठा,
गबजलेलाच असतो आमचा हा college कट्टा...

परिक्षेच्या आधिसुद्धा सगळे इथेच असतात ,
खली ठेवलेल्या notes आता हताताच दिसतात.
Discusion असो अभ्यासाचा नाहीतर फ़क्त गप्पा,
गबजलेलाच असतो आमचा हा college कट्टा...

परीक्षा संपली आता अन् college सुद्धा संपले,
मानत नसतानाही सोडून याला जावे लागले .
पण college मधे गाजवली याने आपली सत्ता,
गजबजतच राहिल आमचा हा college कट्टा

No comments:

Post a Comment